आयुष्मान भारत योजनेच्या कार्ड अपडेटिंगसाठी लिंगनूर दूमाला येथे भरघोस प्रतिसाद

कागल : आयुष्मान भारत गोल्डन कार्ड योजनेमध्ये कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघाचा सबंध देशात प्रथम क्रमांक आला आहे. या योजनेच्या कार्ड अपडेटसाठी आयुष्यमान गाडीवर नोंदणी करण्याचा शुभारंभ रमेश तोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईतील मेडिकेअर हेल्थ सर्व्हीसेसच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे.

 

आयुष्मान भारत ही गोरगरीब जनतेला आधार देणारी पाच लाख रुपयांच्या वैद्यकीय उपचारांची विमा योजना आहे. या दोन गाड्यांच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांची गोल्डन कार्ड अपडेट केले जात आहेत.