चंद्रदीप नरकेंच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

कोल्हापूर: वाशी येथील, बुडके गल्ली व गोठम गल्ली येथील, अंतर्गत रस्ते खडीकरण, डांबरीकरण, कॉंक्रिटीकरण व आरसीसी गटर्स बांधकाम करण्यासाठी नागरी सुविधा योजनेतून 25 लाख रुपये तर दलित वस्ती मधील अंतर्गत रस्ते, खडीकरण, डांबरीकरण, काँक्रिटीकरण व आरसीसी गटर्स बांधकामासाठी दलित वस्ती सुधार योजनेतून 15 लाख रुपये मंजूर कामांचा आज माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

 

 

तसेच 2515 योजनेतून हळदी येथे, अंबाबाई मंदिरासभोवती पेव्हींग ब्लॉक बसवणे व सुशोभीकरण करण्यासाठी 10 लाख रुपये तर कोथळी येथे व्यायाम शाळा इमारत बांधकामासाठी (हनुमान तालीम), कंपाउंड हॉल बांधणे तसेच इतर सोयी सुविधा करण्यासाठी 20 लाख रुपये मंजूर कामांचा देखील आज प्रमुख चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

याचबरोबर कुरुकली येथे दलित वस्ती मधील स्मशानभूमी दुरुस्ती करणे, परिसर सुशोभीकरण करणे व इतर सोयी सुविधा करणे यासाठी 10 लाख तर बबन पाटील गल्ली रस्ता खडीकरण, डांबरीकरण, काँक्रिटीकरण आणि आरसीसी गटर्स बांधकाम करणे (मधली गल्ली) यासाठी 15 लाखाच्या मंजूर कामांचा शुभारंभ करण्यात आला. परिते येथील, मागासवर्गीय वसाहतीमधील अंतर्गत रस्ते खडीकरण, डांबरीकरण, काँक्रिटीकरण व आरसीसी गटर्स बांधकामासाठी 20 लाख रुपये तर व्यायाम शाळा इमारत बांधकामासाठी 22 लाख रुपये आणि मातंग वस्ती मधील रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यासाठी 10 लाख रुपये मंजूर कामांचा देखील आज शुभारंभ करण्यात आला.

यावेळी करवीर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे विविध पदाधिकारी, त्या-त्या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे पत्रकार मित्र आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.