राजूबाबा आवळेंच्या उपस्थितीत अतिग्रे येथे तालुकास्तरीय अधिवेशन व महिला जनजागृती मेळावा संपन्न

कोल्हापूर : उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना हातकणंगले यांच्या तर्फे अतिग्रे येथे तालुकास्तरीय अधिवेशन व महिला जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार राजूबाबा आवळे उपस्थित राहून महिला भगिनींशी मनमोकळा संवाद साधला.

 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यकर्ते कर्मचारी अधिकारी यांना शासनाच्या संक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

या मागणीसाठी कर्मचाऱ्यांची राज्यभर आंदोलने सुरू आहेत आश्वासन देऊन सुद्धा शासनाची मागणीबाबत चालढकल सुरू आहे. शासनाने या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागणी लवकरात लवकर मागणी कराव्यात असा इशारा देत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना यावेळी पाठिंबा दिला.यावेळी तालुक्यातील महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

🤙 8080365706