कोल्हापूर: लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आमदार सतेज पाटील यांनी स्वागत केले.विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचा कालचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्याने आज सकाळी कोल्हापुरात दाखल झाले.
काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा काल (शुक्रवार) कोल्हापूरचा नियोजित दौरा ऐनवेळी रद्द झाला. राहुल गांधी आज ते कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या हस्ते कोल्हापुरातील कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण आणि संविधान सन्मान संमेलनासाठी राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत.