देवस्थान जमीन धारक खंडकरी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेणार

 

कोल्हापूर(सौरभ पाटील)

देवस्थान जमीन धारक खंडकरी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय घेणार. जिल्हा बँकेचे एमडी शिंदे यांचे किसान सभेच्या शिष्टमंडळास आश्वासन.

किसान सभेच्या वतीने देवस्थान जमीन धारक शेतकऱ्यांना केडीसीच्या माध्यमातून पूर्वीप्रमाणेच पीक कर्ज मिळावे यासाठी केडीसीच्या मुख्य शाखेसमोर निदर्शने करून बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
किसान सभेच्या शिष्टमंडळाने जिल्हा बँक व विकास सेवा संस्थांच्या वतीने देवस्थान शेतकऱ्यांना पीक कर्ज देणे बंद केल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांना दिली. उसासारख्या पिकाचे उत्पन्न शेतकऱ्याच्या हातामध्ये येण्यासाठी 14 ते 20 महिन्याचा कालखंड लागतो. त्यामुळे पीक कर्जाच्या माध्यमातून शेतकरी शेतीचा खर्च आणि कुटुंबाचा खर्च करत असतात. परंतु पीक कर्ज बंद झाल्याने शेतीमध्ये योग्य प्रमाणात खते औषधे मशागत इत्यादी निविष्ठांचा वापर न झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. तसेच शेतकऱ्याला सावकारीच्या खाईत ढकलले जाणारे आहे. किसान सभेचे शिष्टमंडळाने पीक कर्जाचा आग्रह धरताना या शेतकऱ्यांच्या सर्व डेटा सेवा संस्थांकडे उपलब्ध आहे तसेच त्यांची पूर्वीचे सर्व कर्जाची रेकॉर्ड उपलब्ध असताना त्या आधारे या शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावी अशी मागणी केली. तसेच सात ब रजिस्टर आणि खंडाची पावती याच्या आधारे आणि इतर दोन शेतकऱ्यांचा जामीन घेऊन या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात यावी अशी मागणी केली.

बँकेचे एमडी शिंदे यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. तसेच नाबार्डच्या ईपीएफ सॉफ्टवेअर मध्ये ज्या सातबारावर शेतकऱ्यांची नावे आहेत अशाच सातबारे अपलोड होतात परिणामी देवस्थान शेतकऱ्यांची नावे सातबारा वर नसल्याने या शेतकऱ्यांची माहिती अपलोड होत नाही या तांत्रिक बाबीमुळे त्यांना पीक कर्ज देता येत नाही. बँकेचे संचालक मंडळ आणि आम्ही याबाबत शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करीत आहे आणि याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी आश्वासन शिंदे दिली.
निदर्शने आणि शिष्टमंडळामध्ये प्राचार्य ए बी पाटील, चंद्रकांत कुरणे, आप्पा परीट, दिनकर आदमापूर संभाजी मोहिते तानाजी यादव लक्ष्मण पाच्छापूरे, बसगोंड पाटील एन. वाय. जाधव, नामदेव जगताप, अमोल नाईकआप्पा परीट लक्ष्मण पाच्छापुरे बसगोंद पाटील एन वाय जाधव अमोल नाईक चंद्रकांत कांबळे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

🤙 9921334545