चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचा शुभारंभ

कोल्हापूर : सांगरूळ, म्हारुळ, बहिरेश्वर, कोगे, एम.एस.सी.बी स्टेशन ते मसोबा देवालय रस्ता सुधारसाठी 70 लाख रुपये, सांगरूळ येथील जोतिबा मंदिर देवालय परिसर सुशोभीकरण करणे, सभा मंडप बांधणे व इतर सोयी सुविधांसाठी 25 लाखाच्या मंजूर कामांचा आज माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

 

 

याचबरोबर खाटांगळे येथील विठ्ठलाई मंदिर परिसर सुशोभीकरण करणे, सभा मंडप बांधणे व इतर सोयी सुविधांसाठी 25 लाख रुपये, म्हारुळ येथील मागासवर्गीय वसाहतीमधील अंतर्गत रस्ते खडीकरण, डांबरीकरण, काँक्रिटीकरण व आरसीसी गटर्स बांधणेसाठी 10 लाख रुपये, बहिरेश्र्वर येथील भाट गल्ली रस्ता खडीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण करणे व इतर सोयी सुविधांसाठी 20 लाखाच्या मंजूर कामांचा आज माझ्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

यावेळी चंद्रदीप नरके यांच्यासमवेत करवीर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे विविध पदाधिकारी, त्या-त्या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे पत्रकार मित्र आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.