हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शेंडूर येथे विविध विकास कामांचे लोकार्पण

कोल्हापूर : काम करत राहणे हे आपले कर्तव्य आहे. आयुष्यभर आपण हेच करत आलो आहे. यापुढेही सर्वसामान्यांच्या हितासाठीच काम करत राहू, गोरगरिबांच्या सेवेला आपण वाहूनच घेतले आहे.शेंडूर ता. कागल येथील विविध विकास कामांचा शुभारंभ व शेतकरी मेळाव्यात हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.

 

 

गेल्या ३०-३५ वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनामध्ये आपण सामान्य माणूसच केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी काम करत आलो आहे. कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये कोट्यावधी रुपयांची कामे केली आहेत त्याचा लेखाजोखा मांडणारी पुस्तिका लवकरच आपल्या हातात पडेल त्यावेळी आपण किती काम करू शकलो हे पहावयास मिळेल. असे ही ते यावेळी म्हणाले.

 

 

🤙 9921334545