बामणीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा हसन मुश्रीफ गटात प्रवेश

कागल : बामणी ता. कागल येथील पांडुरंग दूध संस्थेचे चेअरमन व पार्थसारथी विकास सेवा संस्थेचे संचालक ॲड. सुशांत सदाशिव पाटील, दूधगंगा सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व शाळा समितीचे अध्यक्ष शिवाजी पांडुरंग मगदूम यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी समरजीत घाटगे गटातून मुश्रीफ यांच्या गटात प्रवेश केला. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या सर्वांचे स्वागत करण्यात आले.

 

 

गेली ३० -३५ वर्षे राजकीय आणि सामाजिक जीवनात कार्यकर्त्यांच्या खंबीर पाठबळावरच वाट चालत राहिलो. कार्यकर्त्यांची जागा ही पायाजवळ नसते, ती हृदयात असते. पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांना नेहमीच सन्मानाची वागणूक मिळेल.

यावेळी बोलताना ॲड. सुशांत पाटील म्हणाले, समरजीत घाटगे यांच्या एकछत्री कारभाराला कंटाळून आम्ही त्या गटाचा त्याग केला आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे “काम बोलतय…….!” या भावनेने या पक्षात आलो आहोत. त्यांच्या मोठ्या मताधिक्याच्या ऐतिहासिक विजयासाठी जीवाचे रान करू.

यावेळी ॲड. सुशांत सदाशिव पाटील यांच्यासह शिवाजी पांडुरंग मगदूम, माजी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य आनंद मोरे, विकास सेवा संस्था संचालक चंदर बाबर, बाबुराव पाटील, विकास सेवा संस्थेचे संचालक पुंडलिक पाटील, आनंदा पाटील, अश्विन पाटील, सुहास पाटील, विनोद कांबळे, विनायक बाबर यांचा सत्कार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.