हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बाचणी येथे बौद्ध विहार व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण

कोल्हापूर: बाचणी ( ता. कागल) येथे संविधान सन्मान परिषद पार पडली. त्याचबरोबर बाचनी येथील बौद्ध विहार व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.

 

यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले, संविधान हे सर्वसामान्यासाठी आहे. प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार संविधानामुळे मिळाला आहे. त्यामुळेच माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आमदारा आणि मंत्री झाला.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, मनोज फराकटे, बिद्रीचे संचालक रवींद्र पाटील, सुनीलराज सूर्यवंशी, सूर्यकांत पाटील, दिनकर कोतेकर, दलित मित्र बळवंतराव माने, संजय हेगडे, सुनील खामकर आदि उपस्थित होते.