कोल्हापूर : कोथळी येथे 80 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उदघाटन राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.यामध्ये दत्त सांस्कृतिक भवन माळी समाज बांधकाम शुभारंभ माळी मळा 20 लाख,सुरेश हुलीकिरे घर ते मुख्य रस्ता अमोल पाटील धडेल घर रस्ता काँक्रिटीकरण करणे 20 लाख, कोथळी-समडोळी धरण रस्ता आण्णा पाटील थबगोंडा ते धरण रस्ता मजबुतीकरण करणे30लाख,गोचारवाडा रस्ते कॉंक्रिटीकरण करणे 10 लाख रुपये या विकासकामांचा समावेश आहे.आजअखेर कोथळी गावासाठी 21 कोटी 35 लाख 32 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे.ही विकासाची गंगा यापुढेही असेच सुरू राहील असे आश्र्वासित केले.

यावेळी शिरोळ तालुका सहकार विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे, यड्राव बँकेचे व्हाइस चेअरमन दिलीप मगदूम,सरपंच विजय खवाटे,पंचायत समितीचे माजी सभापती राजगोंडा पाटील,देवगोंडा पाटील,रावसाहेब विभुते,वसंत माळी,अनिल बोरगावे,संतोष उपाध्ये,आकराम पुजारी,देवल हंकारे,हिदायत नदाफ,वर्धमान इंगळे,भाऊसाहेब शेषगोंडा यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
