कोल्हापूर : 9 ऑगस्ट 2022 रोजी हजारो शेतकरी कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली स्वराज्य संघटना आता भारतीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे. स्वराज्य संघटना आजपासून महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून ओळखला जाईल. याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला ‘सप्तकिरणांसह पेनाची निब ‘ हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेले आहे.
मागील वर्षभरात आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवलीच आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील सर्व मतदारापर्यंत पोहोचवणे आपलं कर्तव्य आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम पक्ष संघटनेची कार्यकर्ते व हितचिंतकाची कष्ट राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता हे आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मताने विजय करत परिवर्तन महाशक्तीस सत्तास्थानी घेऊन जाईल असा विश्वास संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.