राजापूर येथे विकास कामांचा उदघाटन सोहळा डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न

कोल्हापूर: राजापूर येथे विविध विकास कामांचे उदघाटन डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाले .राजेंद्र यड्रावकर यांच्या माध्यमातून राजापूर गावासाठी आजअखेर ६ कोटी २२ लाख ५१ हजार रुपयांचा निधी विकासकामांसाठी देण्यात आला.यापुढेही ही विकासाची गंगा यापुढेही असेच सुरू राहील असे यावेळी डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आश्वासित केले.

 

यावेळी रविकांत कारदगे,अरुण मगदूम,हसन जंगले,गुराप्पा कुंभार,आकाश ढगारे,अल्ताफ जमादार, रमजान खोंदू,प्रकाश हिंगमिरे,नवाज खोंदु,रतनगोंडा पाटील,चंद्रकांत गडगे ,रशीद मुजावर,सागर अंकलखोपे,अजित अंकलखोपे, महादेव पाटील,विरकुमार खोत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.