शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई कार्यालयास समरजितसिंह घाटगे यांची सदिच्छा भेट

कोल्हापूर: मुंबई या ठिकाणी कागल, गडहिंग्लज आणि उत्तूर येथील अनेक नागरिक वास्तव्यास असून या नागरिकांशी संवाद साधण्यासाठी कौटुंबिक स्नेहमेळावा कार्यक्रम आयोजित केला होतो. या अनुषंगाने मुंबई येथे समरजितसिंह घाटगे गेले असता शिवशाहू या प्रतिष्ठान या संस्थेच्या ना. म. जोशी मार्ग, लोअर परळ, मुंबई पूर्व येथील कार्यालयास भेट दिली. 

यावेळी, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांना पाईक मानून संस्थेचे काम चालते, अशी माहिती  त्यांना मिळाली. यावेळी त्यांच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातील त्यांच्या कार्यासाठी समरजितसिंह घाटगे यांनी शुभेच्छा दिल्या.