कोल्हापुरात आयटी पार्क उभारणार; कोल्हापूर जिल्ह्यातील भूमिपुत्रांना मिळणार कोल्हापुरातच रोजगार : हसन मुश्रीफ

पुणे : कोल्हापुरात लवकरच आयटी पार्क उभारणार. त्यामुळे कोल्हापूरच्या भूमिपुत्रांना मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यातच रोजगार मिळेल, असे हसन मुश्रीफ म्हणाले. शेंडा पार्कमधील जागा आयटी पार्कसाठी राखीव ठेवली आहे.पुण्यात पुणेकर ग्रामस्थांचा “आम्ही पुणेकर” स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. “आम्ही पुणेकर” स्नेहमेळाव्यात अध्यक्षस्थानी आमदार सुनील शेळके होते. या मेळाव्याला सहा हजारांवर गावकऱ्यांनी जोरदार उपस्थिती लावली.

 

हसन मुश्रीफ म्हणाले ,येणारी विधानसभेची निवडणूक ही खलनायकी प्रवृत्तीच्या विरोधात आहे. तुम्ही मला गेली २५ वर्षे आमदार केले आहे. माझ्या २५ वर्षाच्या कारकिर्दीला थर्मामीटर लावा. जर मी जनतेच्या थर्मामीटरमध्ये आमदार म्हणून यशस्वी झालो असेल तरच मते द्या. गेल्या ३५-४० वर्षांच्या राजकीय, सामाजिक प्रवासात गोरगरिबाच्या सेवेला प्राधान्य दिले. माझ्याकडे आलेला प्रत्येकजण हसत जाईल, याची काळजी घेतली.

आमदार सुनीलआण्णा शेळके म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ हे गोरगरिबांच्या प्रेम आणि पाठबळावर वाढलेले नेतृत्व आहे. राजकीय द्वेषातून ज्यांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास दिला, त्याची परतफेड करायची हीच खरी वेळ आहे. त्यांना सुट्टी देऊ नका. विरोधी उमेदवारही मोठा सोंगाड्या कलाकार आहे.

यावेळी केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, गोकुळ दूध चे संचालक अमरीशसिंह घाटगे, शीतल फराकटे, सतीश पांडुरंग पाटील -बोळावी, स्वप्नील चौगुले -कागल, एकनाथ नार्वेकर – वडगांव, सुभाष पाटील -व्हनाळी, वीरेंद्र भोसले – दौलतवाडी, सुधा रघुनंदन राजमाने- कागल, डॉ. अभय पाटील- कागल, संतोष संकपाळ, अभिजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी वसंतराव धुरे, नवीद मुश्रीफ, शिरीष देसाई, काशिनाथ तेली, सतीश पाटील- गिजवणेकर, शशिकांत खोत, मनोजभाऊ फराकटे, प्रवीणसिंह भोसले, विकास पाटील- कुरुकलीकर, प्रकाशराव गाडेकर, शिवराज पाटील, शिवाजीराव पाटील-गलगलेकर, शैलेश गाडे- पाटील, दत्तात्रय पाटील- बाचणी, आनंदराव चौगुले -सोनाळी आदी उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक उद्योजक संजय चौगुले- मळगे खुर्द यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. आभार उपमहाराष्ट्र केसरी पैलवान रवींद्र पाटील- बानगे यांनी मानले.

🤙 9921334545