मुंबई : विद्यापीठ सिनेट निवडणुकीत शिवसेना उबाठाला घवघवीत यश मिळालं आहे. शिवसेनेला सर्व जागांवर विजय मिळाला असून ही तर विजयाची सुरुवात आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडुकीत ही असेच यश मिळेल.

शिवसेनेच्या युवाशाखा युवा सेना ने निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला ,सर्व दहा पदवीधर जागा मिळवल्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संलग्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सहज पराभव केला.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर कार्यकर्त्यांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले, सिनेट निवडणुकीचे मतदान केवळ मुंबईच नाही तर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही झाले. हा विजय त्यांच्या पक्षाचा प्रभाव दर्शवतो.
