समरजितसिंह घाटगे यांच्या उपस्थितीत शासकीय योजना मंजुरी पत्र वाटप कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर: कागल तालुक्यातील शासकीय योजनेतील लाभार्थी बंधूभगिनींना महाविकास आघाडीच्या वतीने मंजुरी पत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी समरजितसिंह घाटगे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत आपल्या मतदारसंघातील अधिकाधिक नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे सांगितले.

ईडीपासून सुटका करून घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी नात्यांचा सौदा केला असून सध्या पराभव डोळ्यांसमोर दिसत असल्याने ते वैफल्यग्रस्त बनले आहेत, असे नमूद केले. आज एखाद्या पक्ष प्रवेशासाठी खुद्द शरदचंद्र पवार स्वतः येण्याची ही पहिली वेळ असून यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत विजय आपलाच असेल, असा विश्वासही व्यक्त केला.