नेत्यांनी संधी दिली तर ‘उत्तर’ लढवणार :कृष्णराज महाडिक

कोल्हापूर: नेत्यांनी संधी दिली तर उत्तर मधून निवडणूक लढवण्याची तयारी असल्याची माहिती कृष्णराज महाडिक यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.कोल्हापूर शहरातील विविध प्रभागातील रस्ते डांबरीकरण, काँक्रीटीकरण, सामाजिक सभागृह, विरंगुळा केंद्र, बगिचा, विद्युत दिवे, हायमास्ट, व्यायामशाळा अशा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी राज्य सरकारकडून सुमारे २५ कोटी रूपयांचा निधी आणला असल्याची माहिती युवा नेते कृष्णराज धनंजय महाडिक यांनी पत्रकार बैठकीत दिली.

 

कृष्णराज महाडिक यांनी एक यशस्वी फॉर्म्युला थ्री रेसर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तसेच एक लोकप्रिय व्हिडीओ ब्लॉगर म्हणूनही त्यांनी लौकिक निर्माण केला आहे. या व्हिडीओ ब्लॉगच्या माध्यमातून मिळणार्‍या उत्पन्नाचा विनियोग सामाजिक कामासाठी केला आहे. समाजकार्याची आवड आणि बाळकडू असलेल्या कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर शहर आणि जिल्हयाचे प्रमुख सामाजिक प्रश्न, जनतेच्या अपेक्षा समजून घेवून, त्या सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या अनुषंगाने आजवर त्यांनी कोल्हापूरशी निगडीत प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या राजर्षि शाहू जलतरण तलावाच्या दुरूस्तीसाठी आणि सुशोभिकरणासाठी भरीव निधी मंजूर करून आणला असल्याचे सांगून आजवर राज्य शासनाकडून आलेल्या २५ कोटी रूपयांच्या निधी आणला असल्याचे सांगितले .

पत्रकार बैठकीस रूपाराणी निकम, उमा इंगळे, किरण शिराळे, नंदू मोरे, विलास वास्कर, निलेश देसाई, स्मिता माने, बाबा पार्टे, संजय निकम, किरण नकाते, उदय शेटके उपस्थित होते.