कुंभोज (विनोद शिंगे) : पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचा कार्यकर्ता मेळावा सैनिक दरबार हॉल, कोल्हापूर येथे संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील ताराराणी पक्षाचे आमदार प्रकाश आवाडे व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी आज केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

याप्रसंगी आमदार प्रकाश आवाडे व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी आपल्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना एकत्र येऊन देशहितासाठी आणि जनहितासाठी कार्य करण्याचे असे आवाहन केले. पक्षप्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात बळकटी येणार आहे आणि आगामी निवडणुकांमध्ये याचा प्रभावी परिणाम दिसून येईल.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र भाजपा निवडणूक प्रभारी भूपेंद्रजी यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
