कोल्हापूर मध्ये महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्य कार्यकारणी बैठक 28 रोजी

कोल्हापूर  (युवराज राऊत)

1981 साली कोल्हापूरमध्ये कै. हनुमंतराव साळुंखे,कै.शंकरराव जगताप,कै.ना.भू.संगमवार,कै.माधवराव सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून आणि बिहारचे तात्कालीन मुख्यमंत्री जननायक कै.कर्पुरी ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र नाभिक महामंडळाची स्थापना कोल्हापूर मध्ये झाली होती. आजपर्यंत महामंडळाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून कै.गणपतराव माने तिरपणकर,कै. उत्तमराव गंगधर, एम आर टिपुगडे, सयाजी झुंजार, विद्यमान जिल्हाध्यक्ष बाबासाहेब काशीद यांनी काम पाहिलेले आहे. मारुती टिपूगडे हे प.महा.विभागीय अध्यक्ष म्हणून काम पहात आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील नाभिक समाजामध्ये अतिशय ध्येय आणि धोरणे घेऊन काम करणारी संघटना म्हणून महाराष्ट्र नाभिक महामंडळ या संघटनेकडे पाहिले जाते.  या संघटनेच्या वतीने आज पर्यंत अनेक मोठमोठी आंदोलने संपूर्ण महाराष्ट्रात पार पडलेली आहेत. विद्यमान शासनाने “संत सेना महाराज केश शिल्पी महामंडळाची” स्थापना केलेली आहे. त्याचे संपूर्ण यश हे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये या संघटनेचा कार्यभार चालतो. नागपूरपासून मुंबईपर्यंत सर्वच जिल्ह्यामध्ये या संघटनेचे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि सर्व कार्यकारिणीचे सदस्य काम करीत आहेत दर पाच वर्षांनी महामंडळाची कार्यकारणी केली जाते.

सदर राज्य कार्यकारिणीची मध्यवर्ती बैठक शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी करवीर निवासिनी महालक्ष्मी हॉल रंकाळा एसटी स्टँड पाठीमागे दुपारी बारा वाजता होत आहे यासाठी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातून नाभिक समाज कोल्हापूर या ठिकाणी येत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत यामध्ये विशेष करून प्रदेशाध्यक्ष दत्ताजी अनारसे मुंबई, कार्याध्यक्ष सुधीर उर्फ बंधू राऊत नागपूर, राज्य सचिव दिलीप अनारसे औरंगाबाद, राज्याचे मार्गदर्शक रामदास पवार लातूर, अंबादास पाटील नागपूर, महादेव चव्हाण कोकण, सुमनताई पवार पुणे पांडुरंग चौधरी सोलापूर अशा राज्यातील विविध जिल्ह्यातून पदाधिकारी या ठिकाणी येत आहेत.