बीड : महायुतीत मला जागा नाही म्हणून मी विधान परिषदेवर आहे, असं वक्तव्य भाजप आमदार व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवार बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला आहे. 2019 ची लोकसभा निवडणूक जिंकून बीडमधून प्रीतम मुंडे या खासदार म्हणून संसदेत गेल्या.
यावर्षी प्रीतम मुंडे यांना लोकसभेचे तिकीट न देता पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली. मात्र या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला, त्यानंतर भाजपाने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठवलं. पण प्रीतम मुंडे यांची राजकीय वाटचाल कशी असेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, महायुतीत मला जागा नाही म्हणून मी विधानपरिषदेवर आहे.
जेव्हा जेव्हा लढाईची वेळ येईल, तेव्हा तेव्हा आम्ही लढू जेव्हा पक्ष संघटनेसाठी काम करायची गरज असते तेव्हा आम्ही संघटना मजबूत करण्याचं काम करू. गेली पाच वर्ष मी संघटनेचं काम केलं आहे. असं पंकजा मुंडे म्हणाल्या.