तिसरीही मुलगी होत असल्याने केलेल्या गर्भपातात महिलेचा मृत्यू ; पुण्यातील घटना

पुणे : एका 24वर्षीय महिलेचा घरीच गर्भपात केला गेल्याने मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती,सासरा यांना अटक केली आहे. तसेच सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार महिन्याच्या भ्रूणाचा मृतदेह कुटुंबाच्या शेतात पुरण्यात आला होता. ज्या खासगी डॉक्टरांनी ऑपरेशन केले आहे. त्याची देखील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

मिळालेल्या माहितीनुसार या महिलेचे लग्न 2017 ला झाले होते. तिला दोन मुली आहेत. तिसऱ्यांदा देखील मुलगी होत असल्याचे कुटुंबाला कळालं होतं. त्यामुळे त्यांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी अतिरक्तस्त्राव झाल्याने महिलेची तब्येत गंभीर बनली होती. त्यामुळे महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला.

मृत महिलेच्या भावाने या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राहुल भीमराव धोत्रे (वय 28) ,लक्ष्मी भीमराव धोत्रे, भीमराव उत्तम धोत्रे (वय 50 ,तिघे रा. वडापुरी,ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. ऋतुजा राहुल धोत्रे (वय 23, रा.वडापुरी) असे मयत झालेल्या दुर्देवी विवाहितचे नाव आहे.