टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी पाच वर्षाची मुदत

मुंबई : प्राथमिक शिक्षक नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना मुदत वाढवून देण्यात आली असून, ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तीन वर्षा ऐवजी पाच वर्षे मिळणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला.

20 जानेवारी 2016 च्या शासन निर्णयानुसार अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तीन वर्षाची मुदत देण्यात आली होती. परंतु शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयानुसार टीईटी उत्तीर्ण नसलेल्या परंतु अनुकंपा तत्त्वावर कार्यरत असलेल्या शिक्षकांना देण्यात आलेली तीन वर्षाची मुदत वाढवण्यात आले आहे. आता ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना पाच वर्ष देणार आहेत.