जालना: मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. त्या ठिकाणी संभाजी राजे भेटण्यासाठी आले आहेत.छत्रपती संभाजी राजांना शोषितांचा कळवळा नाही, ते राजकारणासाठी आंदोलनात आले असल्याचे आंदोलक लक्ष्मण हाके म्हणाले.संभाजीराजे तुम्ही अवकातीत आणि जनतेच्या हिताचं बोला असा इशारा हाकेंनी दिला.
मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजी राजे छत्रपतींनी मनोज जरांगेच्या विरोधात दुसऱ्या गावात मुद्दाम आंदोलन उभारण मला पटलेले नाही. असं वक्तव्य केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनीही लगेच त्यांना प्रतिउत्तर दिल्याचे दिसल.
जरांगेकडे मतांची बेरीज करण्यासाठी संभाजी भोसले आलेला आहे. आमच्या शिव्या सुरू झाल्या तर जातीयवादी मराठ्यांच्या नेत्यांच्या अंगावर कपडे सुद्धा राहणार नाहीत. असा इशारा नवनाथ वाघमारे यांनी दिला.