कुंभोज प्रतिनिधी:विनोद शिंगे
कुंभोज येथील गेल्या अनेक दिवसापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र काही अडचणीमुळे सध्या बंद अवस्थेत असून अनेक नागरिकांनी सदर ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था केली आहे. परिणामी सदर ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य पसरली असून दवाखान्याच्या खिडकिच्या काचा तसेच अन्य साहित्याची नासधुस करण्यात आली आहे.सदर आरोग्य केंद्राच्या कामावरती कामाचे ठेकेदार यांचे असणाऱ्या दुर्लक्षामुळे, तसेच अंतर्गत काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून ते काम चांगल्या पद्धतीने करण्यात यावे. अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.
सदर काम गेले अनेक महिने रखडले असून सदर आरोग्य केंद्र कडे आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद ,जिल्हाधिकारी कार्यालय, पालकमंत्री व आमदार खासदार व प्रशासन व लोकप्रतिनिधी यांची जाणीवपूर्वक दुर्लक्ष असून येणाऱ्या काही दिवसात सदर आरोग्य केंद्र सर्व सोईयुक्त कुंभोज ग्रामस्थांच्या सेवेसाठी उपलब्ध न झाल्यास सदर आरोग्य केंद्राच्या बाहेर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य संभाजी मिसाळ व माजी उपसरपंच अजित देवमोरे यांनी ग्रामपंचायत बैठकीमध्ये दिला.
यावेळी नागरिकांनी ग्रामपंचायत येथे झालेल्या गाव सभेमध्ये आरोग्य केंद्राची दुरावस्था व उद्घाटन याविषयी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना चांगले धारेवरती धरले. यावेळी सदर पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या काही दिवसात शासनाने आरोग्य केंद्र सुरू न केल्यास त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल असे इशाराही शासनाला दिला आहे.
परिणामी सदर आरोग्य केंद्रासाठी जवळजवळ चार कोटी रुपये खर्च करण्यात आले असून अंतर्गत फर्निचरचे काम व अन्य कामासाठी आरोग्यंद्राचे उद्घाटन रखडले आहे. परिणामी याबाबत आरोग्यमंत्र्यांच्या पासून कलेक्टर पर्यंत सर्वांच्याकडे ग्रामपंचायतीने पाठपुरावा करून ही अद्याप त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून ,आरोग्य यंत्रणेकडे कमी असणारे कर्मचारी यामुळे सदर आरोग्य केंद्राचे उद्घाटन होत नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे. परिणामी आरोग्य विभागाने तात्काळ या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करून हे केंद्र कुंभोज व परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करावे अशी मागणी यावेळी कुंभोज ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार विनोद शिंगे, सचिन भानुसे ,महेश माळी ,आदी मान्यवरांनी केली.