धक्कादायक… सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक !

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल शुक्रवारी हॅक करण्यात आले. अहवालानुसार, यू.एस. Ripple Labs-आधारित कंपनीच्या क्रिप्टोकरन्सीचा प्रचार करणारे व्हिडिओ प्ले केले गेले आहेत. हॅक झालेल्या चॅनलवर व्हिडीओचे लाईव्ह स्ट्रीमिंगही करण्यात आले.

 

सर्वोच्च न्यायालयाचे  अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक  झाले आहे. ज्यामध्ये न्यायालयाच्या कायदेशीर कार्यवाहीच्या जागी Ripple Labs द्वारे विकसित केलेल्या XRP क्रिप्टोकरन्सीचा प्रचार करणारी बेकायदेशीर सामग्री दाखवण्यात येत आहे. न्यायव्यवस्थेसाठी महत्त्वाचे असलेले हे व्यासपीठ सामान्यत: घटनापीठ आणि जनहिताच्या खटल्यांच्या थेट प्रक्षेपणासाठी वापरले जाते. नुकतेच या चॅनलवर आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील बलात्कार आणि खून प्रकरणाच्या खटल्याच्या सुनावणीचे लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आली होती.

तथापि, हॅकर्सने मागील सर्व व्हिडिओ खाजगी मोडमध्ये बदलल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. नेहमीच्या न्यायालयीन कामकाजाच्या जागी, आता ‘ब्रॅड गार्लिंगहाउस: Ripple रिस्पॉन्ड्स टू एसईसीच्या $2 बिलियन फाईन’ शीर्षकाचा लाइव्ह व्हिडिओ प्ले होत आहे.