पुणे : पुण्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन व सुसंस्कृत पर्याय पुढे आणण्याच्या हेतूने राज्यातील समविचारी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या समविचारी पक्षांच्या बैठकीच्या निमित्ताने पुणे दौऱ्यावर असताना छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या पुणे शहरातील मध्यवर्ती कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी आमचे स्वागत केले.
पुणे शहरातील झालेल्या समविचारी पक्षांच्या बैठकीत परिवर्तन महाशक्ती या नावाने नवीन राजकीय पर्याय सर्वांनी एकमताने जनतेपुढे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परिवर्तन महाशक्ती या नवीन आघाडीत प्रहार जनशक्ती पक्ष, स्वराज्य पक्ष, स्वाभिमानी शेतकरी पक्ष, स्वतंत्र भारत पक्ष , महाराष्ट्र राष्ट्र समिती व भारतीय जवान किसान पक्ष सहभागी झाले आहेत. यापुढे देखील अनेक राजकीय पक्ष व संघटनांना सोबत घेण्या प्रयत्न राहणार आहे.
ज्या राजकीय पक्षांना व सामाजिक संघटनांना ‘परिवर्तन महाशक्ती’ मध्ये सहभागी व्हायचे आहे. त्यांनी २६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील बैठकीत सहभागी व्हावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.