कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे
विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची कुंभोज मा.जि.प.सदस्य व वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांनी आपल्या परिसरातील विविध गावातील प्रलंबित विकास कामासंदर्भात व लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा केली.
तसेच कुंभोज गावातील प्रामुख्याने बाजारपेठ रस्ता (दिपक चौक ते आंबेडकर चौक) काँक्रिटीकरण करणे करीता,जॅकवेल रस्ता, माळभागातील व वाडिभागातील प्रमुख रस्त्यांकरिता निधी उपलब्ध करुन द्यावा व गावच्या इतर सामाजिक विषयावर बराच वेळ सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी, खासदारांनी बाजारपेठ रस्ता लवकरच पूर्णत्वास नेऊ याची ग्वाही दिली.तसेच लवकरच शिवालय बांधकाम मुहूर्त करून आणखीन निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करे.नूतन आरोग्य केंद्राचे प्रलंबित प्रश्नात लक्ष देऊन लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत सुरू करू अशी ग्वाही दिली.यावेळी त्यांच्यासोबत गावातील विविध भागातील मान्यवर उपस्थित होते.