कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे
एकात्मिक बाल विकास सेवा योजना हातकणंगले अंतर्गत राष्ट्रीय पोषण अभियानाच्या निमित्ताने पोषण महा साजरा करण्याच्या अनुषंगाने मौजे वडगाव येथे पोषणाचे व विकास साचे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गरोदर माता, स्तनदा माता, झिरो ते सहा वर्षे वयोगटातील बालके यांच्या पोषणाची व पौष्टिक पाककृतीचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यावेळी किशोरवयीन मुलींच्या रांगोळीचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. यावेळी ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाने सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


पाककृती प्रदर्शन ,बालकांच्या विकासासाठी आकार व आरंभ साहित्याचे प्रदर्शन स्वच्छते विषयाची माहिती आदी उपक्रम राबविण्यात आले . सदर कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समितीचे तालुका अध्यक्ष अविनाश बनगे, मौजे तासगावचे सरपंच चंद्रकांत गुरव, शिवाजीराव पाटील ,बाल विकास प्रकल्प प्रमुख शिंदे , सविता भोसले , प्रकल्पातील अन्य पर्यवेक्षिका,बीट सावर्डे मधील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी या क्रायक्रमात भाग घेतला.
