दिल्ली : ‘एक देश, एक निवडणूक’ या प्रस्तावाला बुधवारी झालेल्या बैठकीत मोदी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ‘वन नेशन वन इलेक्शन’ कमिटीने हा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवला होता.या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या अहवालानंतर मंत्रिमंडळात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. एनडीए सरकार हे विधेयक हिवाळी अधिवेशनात संसदेत आणणार आहे. त्यानंतर येत्या काळात याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.