कोल्हापूर प्रतिनिधी : सौरभ पाटील
आजपासून सुरू होणाऱ्या करवीर तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार चंद्रदीप नरके उपस्थित होते. NIS महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्र दोनवडे या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन 18, 19 व 20 सप्टेंबर पर्यंत करण्यात आले आहे. या कुस्ती संकुलाच्या खेळाडूंनी आंतराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. थायलंड या ठिकाणी झालेल्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत विजेती ठरलेली रोहिणी देवबा हिचा सत्कार करण्यात आला.
आपल्या भागातून अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडत राहावेत, यासाठी मी देखील नेहमी प्रयत्नशील असतो.असे चंद्रदीप नरके म्हणाले.
या प्रसंगी कुस्ती केंद्राचे संस्थापक हरी पाटील आमशीकर, प्रशिक्षक संदीप पाटील, हनमंतवाडी सरपंच संजय जाधव, आंतरराष्ट्रीय खेळाडू व पंच बाबासो शिरगावकर, युनिव्हर्सिटी चॅम्पियन रघुनाथ मोरे, कोजीमाशीचे चेअरमन मदन निकम, बाबासो पोवाळकर, करवीर क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संदीप पाथरे, कुंभी कुस्ती संकुलाचे प्रशिक्षक प्रकाश पाटील, संग्राम पाटील, बनसोडे सर, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू प्रवीण साळोखे, राऊत सर, सुनील कदम, स्वराज्य शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक संदीप लंबे, स्पर्धक, इतर खेळाडू व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.