अल्पसंख्याक (मुस्लिम) मतदारांची नवीन नावे मतदार यादीत नको ‘या’ ग्रामपंचायतीने केला ठराव ;

कोल्हापूर: शिंगणापूर ( ता. करवीर )  ग्रामपंचायत मध्ये मुस्लिम मतदारांची नवीन नावे मतदार यादीत समाविष्ट न करण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आल्याचे पत्र प्रसिद्ध झाले . परंतु हे पत्र अधिकृत नसल्याचे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सांगितले .या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद स्तरावर गट विकास अधिकारी व करवीर तहसीलदारांना दिली आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्या वर कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल एडके यांनी दिली.

 

शिंगणापूरची ग्रामसभा 28 ऑगस्ट रोजी झाली. त्याचा ठराव समाज माध्यमावर प्रसिद्ध झाला होता . यामध्ये शिंगणापूर गावच्या हद्दीत नवीन मतदार नोंदणी करताना मुस्लिमांची नावे समाविष्ट करण्यात येऊ नयेत असे ठरवलं. ज्यावेळी मतदार यादी प्रसिद्ध होईल त्यावेळी नवीन अल्पसंख्याकांची नावे नोंद झाल्याचे आढळल्यास त्यावर ग्रामपंचायतीमार्फत हरकती घेऊन ती नावे कमी करण्यात यावीत असा ठराव करण्यात आला.

या ठरावाला सूचक म्हणून प्रमोद संभाजी मस्कर तर अनुमोदक म्हणून अमर हिंदुराव पाटील यांची नावे असून या पत्रावर सरपंच रसिका पाटील व ग्रामविकास अधिकारी दिपाली एडके यांच्या सही असल्याची प्रत व्हायरल झाली आहे.