मुंबई: धनगर आणि धनगड एकच आहे. असा जीआर काढण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. परंतु या निर्णयाला महायुतीतूनच विरोध झाल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. विधानसभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी मधूनच आरक्षण देण्याचा अट्टाहास का ? असा सवाल उपस्थितीत केला आहे.
नरहरी झिरवाळ म्हणाले की, धनगर समाजाला आरक्षण द्यावे यावर आमचे दुमत नाही. पण आमच्यातून देऊ नये ही सरकारला विनंती आहे.सरकारच्या निर्णयाविरोधात आदिवासी, आमदार, नेते, संघटना सर्व एकत्र येतील. आम्ही सर्व आदिवासी नेत्यांची बैठक घेऊन विरोध करायचा की न्याय मागायचा हा निर्णय घेतला जाणार आहे. असेही ते म्हणाले.