कुंभोज आरोग्य केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत राजकारणामुळे उद्घाटन तटले;

कुंभोज प्रतिनिधी: विनोद शिंगे

कुंभोज तालुका हातकलंगले येथे गेल्या चार वर्षापासून मंजूर असणाऱ्या प्राथमिक आरोग्यं केद्राच्या इमारतीचे बांधकाम जवळजवळ चार कोटी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आले आहे. परिणामी राजकीय षडयंत्र व गटातटाच्या राजकारणात सदर इमारतीचे उद्घाटन तटले असल्याची चर्चा सध्या कुंभोज परिसरात जोर धरत असून इमारतीची बांधकाम पूर्ण होऊनही सदर इमारत अद्याप शासनाच्या ताब्यात का घेण्यात आली नाही, त्या ठिकाणी अजूनही प्राथमिक आरोग्य केंद्र चालू का करण्यात आले नाही ?असा सवाल वारंवार तयार होत आहे,परिणामी मागील मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री असणाऱ्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांनाही बऱ्याच वेळा सदर आरोग्य केंद्राचे उद्घाटन करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले होते.

 

 

 

त्यावेळी केवळ आश्वासने मिळाली. सध्याचे विद्यमान आमदार राजू बाबा आवळे यांनीही काही दिवसापूर्वी एक महिन्याच्या आत सदर आरोग्य केंद्राचे उद्घाटन केले जाईल त्या संदर्भात कोल्हापूर जिल्हा कलेक्टर यांच्याशी चर्चाही केली होती. परंतु ती चर्चा केवळ चर्चा ठरत असून सदर आरोग्य केंद्राच्या इमारतीची सध्या अत्यंत दुरावस्था झाली असून सदर आरोग्य केंद्राच्या इमारतीचा गैरवापर होत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास कोट्यावधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या इमारतीचे पुढे काय होणार अशी अवस्था निर्माण झाली असून सध्या केंद्रात आवश्यक असणाऱ्या आरोग्य कर्मचारी डॉक्टर्स, यांची कमतरता असून सरळ आरोग्य केंद्राचे उद्घाटन लवकरात लवकर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांच्यातून होत असून सदर दवाखाना गावात असूनही अनेक नागरिकांचे किरकोळ बाबीसाठी जीव गेल्याने नागरिकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.