वैरणीचा भारा अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू ;

कोल्हापूर : लोटेवाडी (ता.भुदरगड) येथील शेतकऱ्याचा वैरणीचा भारा अंगावर पडून मृत्यू झाला. धोंडीराम मारुती परीट (वय 32) असे या शेतकऱ्याचे नाव आहे या घटनेची नोंद भुदरगड पोलीसांत झाली आहे.

मिळालेली माहिती अशी की, धोंडीराम परीट हे विद्यामंदिर शाळेजवळच्या शेतात जनावरांना वैरण आणण्यासाठी (ता.13)सकाळच्या सुमारास गेले होते.  वैरण चा भारा घेऊन येताना त्यांचा पाय घसरला व वैरणीचा भारा अंगावर पडून त्यांना गंभीर दुखापत झाली. गारगोटी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई असा परिवार आहे.

🤙 8080365706