कुंभोज प्रतिनिधी: विनोद शिंगे
सत्कार हा सत्कार्याचा होत असतो , एखाद्या विद्यार्थी अथवा व्यक्तीच्या अंगात असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्याच्या अंगातील शेतकऱ्याचे कौतुक करून आपण उत्तेजना देतो व पुढील वाटचालीस शुभेच्छा देत असतो, त्यासाठी समाजातील सर्वच घटकातील विद्यार्थी युवक नागरिक व महिलांचा योग्य वेळी योग्य ठिकाणी सत्कार होणे गरजेचे आहे. व ते प्रयत्न सतत अखिल गुरव समाज संघटनेचे मार्फत केले जातात .असे गौरव उद्गार कोल्हापूर जिल्हा अखिल भारतीय महिला गृह संघटनेच्या जिल्हाध्यक्ष स्मितारानी गुरव यांनी काढले.
त्या पुष्पनगर तालुका गारगोटी येथे अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ प्रसंग बोलत होत्या. गुरव समाज संघटने मार्फत पहिली ते दहावीपर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच दहावी ते शासकीय नोकरी पर्यंत केलेल्या मुलांचा आणि मुलींचा गुरव संघटनेमार्फत केलेला सत्कार सत्कार हा संजय गुरव व स्मिता राणी राजेंद्र गुरव सभापती आणि प्रदेश सरचिटणीस यांच्यामार्फत करण्यात आला.
ह्या सत्कारासाठी उपस्थित वसंत गुरव, अमोल गुरव ,सुशांत गुरव रमेश गुरव ,विनोद गुरव ,दयानंद गुरु दत्तात्रय गुरव, संदीप गुरव, पी डी अण्णा गुरव ,राजेंद गुरव ,एकनाथ गुरु शशिकांत गुरव, तुकाराम गुरव ,मारुती गुरव भगवान गुरव,राकेश गुरव व सर्व गुरव समाजाच्या महिला भगिनी उपस्थित होते.