काँग्रेसच्या पोटातले ओठावर – जिल्हाध्यक्ष विजय जाधव ; भाजपा कोल्हापूरच्या वतीने राहुल गांधी यांचा तीव्र निषेध

कोल्हापूर प्रतिनिधी- संग्राम पाटील

अमेरिकेत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण संपवण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने बिंदू चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली.यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांनी राहुल गांधींचा धिक्कार असो, आरक्षण रद्द करू पाहणाऱ्या राहुल गांधीचा धिक्कार असो, राहुल गांधीच करायचं काय खाली डोक वर पाय, डॉ बाबासाहेब यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा धिक्कार असो अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

 

 

यावेळी, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहूल चिकोडे, सत्यजित कदम, नाथाजी पाटील, राजवर्धन नाईक-निंबाळकर, माणिक पाटील-चुयेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, राहुल गांधी यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा भाजपा कोल्हापूरच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. आज संविधानाच्या सन्मानासाठी भाजपा मैदानात उतरली आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले संविधान नष्ट करण्याचे काम काँग्रेस नेते राहुल गांधी करत आहेत. काँग्रेस पक्षाला जनतेचे काही पडलेले नाही फक्त आणि फक्त सोयीनुसार आपली पोळी भाजून घेण्याचे काम आज अखेर काँग्रेस पक्ष करत आलेला आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणावर केलेल्या व्यक्तव्याचा भाजपा म्हणून निषेध करतो. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, आदिवासी, ओबीसी, मागासवर्गीयांना दिलेले आरक्षण हे कोणीही संपवू शकत नाही. गेल्या लोकसभेमध्ये भाजपला चारशे जागा कशासाठी पाहिजे आहेत, तर आरक्षण रद्द करण्यासाठी पाहिजे आहेत असा खोटा आरोप ज्या काँग्रेसने केला त्या काँग्रेसचा खरा चेहरा आता जनतेसमोर येत आहे. सातत्याने बघितले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याचे काम काँग्रेसचे राहुल गांधी करीत असल्याचे आपल्याला दिसत आहे. ज्या काँग्रेस पक्षाने आरक्षणावर राजकारण करण्याचे काम केले आहे त्यांना जनता येत्या विधानसभेमध्ये जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही.
यावेळी प्र का सदस्य राहूल चिकोडे, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, सत्यजित कदम, हेमंत आराध्ये यांनी तीव्र शब्दात निषेध करत आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी ,सरचिटणीस डॉ राजवर्धन, डॉ. आनंद गुरव, जिल्हा उपाध्यक्ष राजू मोरे, अप्पा लाड, भरत काळे, अतुल चव्हाण, प्रदीप उलपे, विशाल शिराळकर, अभिजित शिंदे, गिरीष साळोखे, संदीप कुंभार, दिलीप मेत्राणी, किरण नकाते, अनिल कामत, प्रकाश घाटगे, राहुल सोनटक्के, सचिन आवळे, रविकिरण गवळी, दिलीप बोंद्रे, ओंकार गोसावी, रणजीत औंधकर, बंकट सूर्यवंशी, सुमित पारखे, सतीश आंबर्डेकर, महेश यादव, सचिन घाटगे, संजय पाटील, शिवाजी बुवा, योगेश साळोखे, सनी आवळे, सतीश रास्ते, नरेंद्र पाटील, सुधीर बोलावे, प्रशांत अवघडे, महेश चौगले, प्रमोद कांबळे, भगवान काटे ई. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 9921334545