ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा भेंडवडे येथे संपन्न ;

कुंभोज  प्रतिनिधी : विनोद शिंगे

भेंडवंडे तालुका हातकणंगले येथे ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी मेडिकलचे कॅम्प आयोजित केला होता. यामध्ये नागरिकांसाठी हृदयरोग, टीबी, श्वसन रोग ,कृष्ठरोग आदी रोगांच्या बाबतीमध्ये तपासण्या करण्यात आल्या. तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना यांचे फार्म भरण्यात आले.

 

 

 

यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अनुराधा कांबळे, सावर्डे आरोग्य उप केंद्रचे डॉक्टर श्रेयश चौगुले , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजीराव पवार, नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे राज्याध्यक्ष वसंतराव चव्हाण हर्षवर्धन चव्हाण आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.

यावेळी सहाय्यक आयुक्त अनुराधा कांबळे ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने वयोश्री योजना तसेच मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना चालू केली असून यामध्ये वयोश्री योजना लाभार्थ्यांना वार्षिक 3000 चा आरोग्याच्या उपकरणासाठी लाभ होणार आहे. तीर्थदर्शन योजनेतून राज्यातील व आपल्या परराज्यातील तीर्थदर्शनाचा लाभ मिळणाऱ्या याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. ज्येष्ठ नागरिकांच्या कायद्यासंदर्भात मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक हर्षवर्धन चव्हाण यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी चा मेळावा आयोजित करण्यामागील उद्देश घराघरातील ज्येष्ठ नागरिकांच्या असणाऱ्या अडचणी त्यावरील उपाय व शासनाचे असणारे कायदे हे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणार आहेत याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ.प्रतीक्षा वाघ ,डॉ. सत्यजित तोरस्कर, डॉ. प्रदीप पाटील ,लॅब टेक्निशियन कुलकर्णी , आरोग्य सेवक चव्हाण,संजीवनी वाघमोडे, सागर पोळ ,एस व्ही आईवळे ,वैशाली कांबळे ,वसंत चव्हाण ,भोपाल भिसे, संदीप चव्हाण, आशा वर्कर, परिचारक आदी मान्यवर उपस्थित होते.