पर्यावरणपूरक घरगुती गौरी गणपती विर्सजनास नागरिकांचा उर्त्स्फत प्रतिसाद ; इराणी खणीमध्ये 56,372 गणेश मुर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

कोल्हापूर :घरगुती गौरी गणपती विसर्जनास शहरातील नागरीकांनी उत्सफुर्त प्रतिसाद देऊन 56,372 मुर्ती इराणी खणीमध्ये पर्यावरणपूरक विसर्जित करण्यात आल्या. महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद देऊन शहरातील नागरकांनी महापालिकेच्यावतीने ठेवण्यात आलेल्या पर्यावरण पूरक कृत्रिम विसर्जन कुंडामध्ये व इराणी खणीमध्ये गणेश मुर्ती विसर्जित केल्या. पंचगंगा नदी तसेच शहर परिसरातील तलावांचे प्रदूषण होऊ नये म्हणून महापालिकेच्यावतीने शहरात ठिक ठिकाणी 207 पर्यावरण पूरक विसर्जन कुंडाची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. या व्यतिरिक्त सार्वजनिक मंडळांनी, तालमींनी व संस्थांनीही काहीली व कृत्रिम विसर्जन कुंड ठेवले होते.
घरगुती गौरी गणपती विसर्जनाकरिता महापालिकेच्यावतीने सर्व यंत्रणा सकाळी 7 वाजल्यापासून दुस-या दिवशी पहाटे 6.00 वाजेपर्यंत काम करत होती.

 

 

यामध्ये, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पवडी, आरोग्य विविध विभागाचे व व्हाईट आर्मीचे जवान असे सुमारे 3000 कर्मचारी, गणेश मुर्ती संकलनासाठी 145 टँम्पो 450 हमाल, 5 जे.सी.बी., 7 डंपर, 4 टॅक्टर, 4 पाण्याचे टँकर, 2 बुम, 6 ॲम्बुलन्स व 7 साधे तराफे व 7 फलोटींगचे तराफे अशी यंत्रणा तैनात करण्यात आली होती. पवडी विभागाकडून शहरात विविध ठिकाणी नागरिकांनी अर्पण केलेल्या गणेशमुर्ती टॅम्पोमधून नेऊन इराणी खणीमध्ये विसर्जीत करण्यात आल्या. याचबरोबर महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवानही विसर्जनस्थळी सुरक्षिततेसाठी साधन सामग्री सह तैनात करण्यात आले होते. विद्युत विभागाकडून विसर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था, नागरिकांनी अर्पण केलेले निर्माल्य गोळा करण्याचे काम करण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने 12 आरोग्य निरिक्षकच्या टिम व अवनी संस्थेच्या 100 महिला सदस्य निर्माल्य संकलित केले. यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने 550 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संकलित करण्यात आलेले निर्माल्य खत तयार करण्यासाठी पुईखडी, बापट कॅम्प, बावडा, दुधाळी, आयसोलेश हॉस्पीटल येथे पाठविण्यात आले आहे. याठिकाणी अवनी संस्थेच्या महिलांच्याकडून निर्माल्याचे विलगीकरण करुन खत निर्मितीचे काम केले आहे. आरोग्य विभागामार्फत 207 ठिकाणच्या कुंड ठेवलेल्या ठिकाणांची, पंचगंगा नदीजवळील गायकवाड पुतळा परिसर व इराणी खण परिसराची स्वच्छता पहाटे सुरु होती.

नागरिकांनी अर्पण केलेले 140 मे.टन. निर्माल्य 9 डंपर व 3 ट्रॅक्टरद्वारे पहाटे पर्यत गोळा करण्यात आले.
प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी नागरिकांना गणेशोत्सव जास्तीत जास्त पर्यावरणपुरक, गर्दी टाळून महापालिकेने पर्यायी व्यवस्था केलेल्या कृत्रिम कुंडात विसर्जन करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास शहरातील नागरीकांनी प्रतिसाद देऊन गांधी मैदान विभागीय कार्यालय अंतर्गत 11063, छ.शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय अंतर्गत 8145, राजारामपुरी विभागीय कार्यालय अंतर्गत 7854, ताराराणी विभागीय कार्यालया अंतर्गत 7332 अशा 15911 गणेश मुर्तींचे विसर्जन कृत्रिम कुंडात करुन महापालिकेस सहकार्य केले आहे. त्याचप्रमाणे शहरातून व ग्रामीण भागातून आलेल्या 21978 मुर्ती नागरीकांनी थेट इराणी खण येथे विसर्जीत केल्या. याव्यतिरिक्त काही नागरीकांनी गणेश मुर्ती घरीच बादलीमध्ये विसर्जित करुन पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा केला. इराणी येथे विभागीय कार्यालय व नागरीकांडून अर्पण केलेल्या मुर्ती महापालिकेने बसविलेल्या स्वयंचलित यंत्राद्वारे खणीमध्ये विसर्जित करण्यात आल्या.

स्वयंचलित यंत्राद्वारे 15911 घरगुती गौरी गणपती विसर्जन
इराणी खण येथील गणेश मुर्ती विसर्जनाच्या स्वयंचलित यंत्राद्वारे 15911 घरगुती गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले. महापालिकेच्यावतीने घरगुती गणेश मुर्तींचे विसर्जन इराणी खणीमध्ये करण्यासाठी स्वयंचलित यंत्र मागील वर्षी बसविण्यात आले होते. यासाठी 83 लाख रुपये खर्च करण्यात आले असून महापालिकेच्यावतीने फौंडेशन व इतर कामासाठी 7 लाखचा निधी खर्च करण्यात आला आहे.
सदरचे नियोजन प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप-आयुक्त साधना पाटील, पंडीत पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, नेहा आकोडे, कृष्णा पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत व जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, उप-शहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता रमेश कांबळे, महादेव फुलारी, आर के पाटील, सुरेश पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, विद्युत अभियंता अमित दळवी, पर्यावरण अभियंता अवधूत नेर्लेकर, वर्कशॉप प्रमुख विजयसिंह दाभाडे यांनी केले.