कोणाच्याही दबावाला बळी न पडता आमदार राजूबाबा आवळे यांच्या विजयाचे शिल्पकार बना ;

कुंभोज प्रतिनिधी :विनोद शिंगे

कोणाच्याही दबावाला बळी न पडता आमदार राजूबाबा आवळे यांच्या विजयाचे शिल्पकार बना. असे आवाहन वारणा सहकारी दूध संघाचे माजी संचालक व नागाव विकास सोसायटीचे चेअरमन महावीर पाटील यांनी केले. ते आमदार राजूबाबा आवळे यांच्या संपर्क दौऱ्यानिमित्त कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी आमदार राजूबाबा आवळे, माजी पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत व हातकणंगले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भगवानराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

ते पुढे म्हणाले, विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर आले आहे. कालावधीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भीतीला कोणीही किंमत देऊ नये.व गावातून आमदार आवळे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देवून सर्वांनी प्रयत्न करावेत असे पाटील यांनी सांगितले.

यावेळी बोलताना राजूबाबा आवळे म्हणाले की,आपल्या मतदार संघातील युवकांना रोजगारासाठी पुणे,मुंबई यासारख्या अनेक ठिकाणी जावे लागते.या बाबींचा विचार करून आपल्या मतदारसंघातच विविध इंडस्ट्रियल पार्क उभे करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.तसेच नागाव गावामध्ये माझ्या माध्यमातून हजार लोकांना पेन्शन उपलब्ध करून दिली आहे.विविध विकासकामांना निधी उपलब्ध करून दिला आहे.तर गॅस ,वीज दरवाढ व जिएसटी च्या माध्यमातून सर्व सामान्य लोकांची महायुती सरकारने आर्थिक लुट सुरू केली आहे.यातून सुटका होण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी ची सत्ता येणार आहे,त्यामुळे पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला निवडून देऊन सहकार्य करावे. लागेल तेवढा निधी देण्याची ग्वाही आवळे यांनी दिली.

या प्रसंगी तालुका उपाध्यक्ष उत्तम पाटील,आघाडी प्रमुख डॉ. गुंडा सावंत, दिपक लंबे,अनिल शिंदे, भाऊसो पाटील,महंमद मुलाणी,ग्रामपंचायत सदस्य अजित घाटगे,अभिनंदन सोळांकुरे,सतीश लंबे,अमित खांडेकर, गजानन पोवार,विलास चव्हाण, बबलू लंबे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.