पत्नीने केला नवऱ्याचा खून

पुणे : स्वतःच्या नवऱ्याचा पत्नीने खून केल्याची धक्कादायक घटना नऱ्हे येथे घडली आहे. दारू पिऊन वारंवार त्रास देऊन भांडण करणाऱ्या नवऱ्याचा पत्नीने खून केला ही घटना रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. किरप्पा बिस्त (वय 42 मूळ रा. नेपाळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याची पत्नी हिरा बिस्त (वय 46) हिला सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, स्वप्नपूर्ती रेसिडेन्सी मध्ये वॉचमन म्हणून हे पती-पत्नी दोघे राहत होते .किराप्पा हा दारू पिऊन त्याच्या पत्नीला त्रास देत होता रविवारी तो दारू पिऊन आल्यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाले. रागाच्या भरात पत्नीने त्याच्या पोटात चाकू भोसकून खून केला. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर हे अधिकाऱ्यासह घटनास्थळी पोहोचून अधिक तपासाबाबत सूचना केल्या.

 

 

🤙 9921334545