मुंबई: विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तसे राज्यपातळीवर दोन्ही आघाड्या ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. अशातच असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम ने महाविकास आघाडीत सामील होण्याची तयारी दर्शवली असून तसा प्रस्ताव महाविकास आघाडीला दिला आहे.
या प्रस्तावामध्ये इम्तियाज जलील म्हणाले, आमच्या आणि शिवसेनेच्या विचारसरणीत मतभेद आहेत तरीही राजकीय तडजोड म्हणून आम्ही शिवसेना महाविकास आघाडीत असताना आघाडी करण्यास तयार आहोत आम्हाला राज्यातील शेतकरी आणि लोकांचे हित महत्वाची वाटते ज्या ठिकाणी आमच्या पक्षाची स्थिती मजबूत आहे त्या ठिकाणी आम्ही लढवणार असा प्रस्ताव हा विकास आघाडीला दिला आहे .यापुढे ते म्हणाले, की आम्ही महाविकास आघाडीच्या उत्तराची 9 सप्टेंबर पर्यंत वाट पाहणार आहोत त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर आम्ही आमच्या इच्छुक उमेदवारांना अर्ज देण्यास सुरुवात करू व निर्णय न झाल्यास स्वबळावर लढू असा इशाराही एआयएमआयएम ने दिला आहे.