कोल्हापूर: करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे व त्यांच्या पत्नी विजया देवी यांनी 30 लाख 11 हजार 17 रुपये किमतीचे दागिने अर्पण केले.
यामध्ये सोन्याचा दुपदरी साज आणि सोन्याचे एक जोड तोडे असे सुवर्णदान केला आहे.
यावेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे उपस्थित होते. काही दिवसापूर्वी अंबाबाई चरणी एका भाविकांनी 71तोळे 100 ग्रॅम सोन्याचा सुवर्णसिंह अर्पण केला होता .अंदाजे त्याचे मूल्य 50 लाख 37 हजार इतके होते.