मिरवणुकीतील लेसर मुळे तरुणाच्या डोळ्यात रक्तस्त्राव

कोल्हापूर: गणपती आगमन मिरवणुकीमध्ये लेसर किरणाच्या प्रखर विद्युत होता मुळे एका तरुणाच्या डोळ्यातून रक्तस्त्राव झाला हा तर तरुण उचगाव (ता. करवीर) येथील आहे त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

उचगाव येथे गणपतीच्या मिरवणुकीमध्ये लेसर किरणाचा  विद्युतझोत वापरण्यात आला होता. या विद्युत झोताची  किरणे थेट डोळ्यावर पडल्याने या तरुणाचा डोळा लाल झाला. व डोळ्यातून पाणी येऊ लागले त्याला रुग्णालयात आणले असता त्याच्या बुबुळाला या किरणामुळे इजा होऊन आत रक्तस्त्राव झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले.

दरम्यान गणेश मिरवणुकीच्या  बंदोबस्तासाठी उभारलेल्या एका पोलिसाच्या डोळ्यालाही या लेसर किरणामुळे इजा झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

🤙 8080365706