दुर्गेवाडीच्या राजाचे मोठ्या दिमाखात स्वागत, एक गाव एक गणपती ही संकल्पना वीस वर्षापासून अमलात

 

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे

दुर्गेवाडी तालुका हातकणंगले येथील गेल्या पन्नास वर्षापासून अबाधित असणाऱ्या एक गाव एक गणपती ही संकल्पना प्रत्यक्षात हातकणंगले तालुक्यात दुर्गेवाडी येथे राबवली जात असून, अत्यंत मानाचा व नवसाचा समजला जाणाऱ्या दर्गेवाडीच्या राजाचे आज पहाटे मोठ्या दिमाखात फटाक्याची आताषबाजी पारंपरिक वाद्याच्या गजरात कुंभोज येथून भव्य मिरवणुकीने दुर्गेवाडी येथे आगमन झाले.
समस्त दुर्गेवाडी व हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दर्गेवाडीच्या राज्याचे झालेले आगमन पाहण्यासाठी कुंभोज सह परिसरातील नागरिकांनी एसटी स्टँड परिसरात मोठी गर्दी केली होती.

 

पहाटे निघालेले मिरवणुकीने वातावरण भक्तीमय बनले होते. गणपती बाप्पा मोरया च्या गजरात गणरायाच्या स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी सदर मानाचे असणाऱ्या दुर्गेवाडीच्या राज्याचे महिलांनी आरती करून स्वागत केले. सदर दुर्गेवाडीच्या राजाच्या आगमनासाठी दहा दिवस मोठ्या प्रमाणात दुर्गेवाडी ग्रामपंचायत दुर्गेवाडी ग्रामस्थ व तरुण मंडळाच्या वतीने अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सदर कार्यक्रमासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी दुर्गेवाडी येथील अनेक युवकांचे महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली असून त्यांचा सत्कार समारंभ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

🤙 8080365706