मुंबई : राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत 9200 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी उभारण्यात येणार आहे.
त्यापैकी तीन मेगावॅट क्षमतेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे सुरू करण्यात आला. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे.