मुंबई : विनेश फोगाटच्या रूपात भारताला ऑलिम्पिक मध्ये पहिले सुवर्णपदक मिळणार होते. मात्र ऑलिम्पिक च्या अंतिम फेरीमध्ये विनेश ही अपात्र ठरली त्यामुळे संपूर्ण भारताला धक्का बसला. विनेश फोगाड चे 100 ग्रॅम वजन वाढल्यामुळे ती अपात्र ठरली. यावरून बरेच राजकारण रंगले. विनेश भारतात आल्यानंतर तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं यात काही काँग्रेस नेत्यांचा सुद्धा समावेश होता. आता विनेशने एक मोठी घोषणा करत भारतीय रेल्वेतील नोकरीचा राजीनामा दिला आहे.
विनेशने सोशल मीडियावर एक पत्र शेअर करत म्हटलं की, ” भारतीय रेल्वेची सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय काळ आहे. पण आता मी रेल्वे सेवेपासून वेगळी होण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्याकडे राजीनामापत्र सादर केले आहे. देश सेवेसाठी रेल्वेने मला दिलेल्या संधीबद्दल मी भारतीय रेल्वे परिवाराची सदैव ऋणी राहील. ”
विनेश फोगाटच्या राजीनाम्या मुळे आता ती राजकारणात प्रवेश करेल का ? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.