लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळलं : चार जवानांचा मृत्यू

मुंबई : पाकयोंग जिल्ह्यात लष्कराचे एक वाहन 300 फूट खोल दरीत कोसळल. ही दुर्घटना गुरुवार (दि.5)रोजी सिक्किम मध्ये घडली. या अपघातात 5जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

 

 

पश्चिम बंगालमधील बेडोंग येथून सिक्कीम मधील पाकयोंग जिल्ह्यातील रेशीम मार्गावरील झुलककडे हे लष्कराचे वाहन जात असताना हा अपघात झाला.

लष्कराच्या ताफ्यात तीन वाहनांचा समावेश होता. यातील एका वाहनाचा अपघात झाला. यात ताफ्यामध्ये तीन सैन्य अधिकारी ,दोन जेसीओ आणि 34 सैनिक होते.या दुर्घटनेवर  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला.