मुंबई : इमारतीमध्ये काम सुरू असताना यातील पाच मजूर खाली पडल्याची धक्कादायक. घटना घडली आहे. मालाड पूर्व येथील नवजीवन एस आर ए प्रकल्प इमारतीमध्ये काम सुरू असतानाही ही घटना घडली.

यामध्ये, दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे . तर तीन जण जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.घटनास्थळी अग्निशमन दलाचे पोलीस दाखल झाले आहेत.
