माजी आमदार सुजित मिंणचेकर व खासदार शरद पवार यांची कोल्हापूर येथे भेट व राजकीय चर्चा

कुंभोज प्रतिनिधी  :विनोद शिंगे

कोल्हापूर : कोल्हापूर येथे खासदार शरदचंद्रजी पवार यांची हातकलंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंणचेकर यांनी भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा केली असल्याचे समजते. परिणामी येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात राजकीय परिवर्तन होणार असल्याचे मत ही यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने बोलले जात होते. परिणामी यावेळी नेमकी कोणती चर्चा मिणचेकर व पवार साहेब यांच्यात झाली यावर वेगवेगळे तर्कवितर्क मांडले जात आहेत.

 

 

शरदचंद्रजी पवार यांची कोल्हापूर जिल्हा भेट कोणालाच तारणारी व कोणाला मारणारी ठरणार हे येणारी वेळ व काळच ठरवेल.
यावेळी स्वागत हातकणंगले विधानसभेचे कार्यसम्राट मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर (संचालक – गोकुळ दुध संघ,कोल्हापूर) यांनी केले.

स्वागत करताना शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले,जिल्हापरिषद मा. सभापती प्रवीण यादव, संजय गांधी समिती अध्यक्ष व मा. जिल्हापरिषद सदस्य महेश चव्हाण, उद्योगपती RD पाटील साहेब उपस्थित होते.