भारत पाटणकर सरांचा जीवनप्रवास माझ्यासारख्या तरुणांसाठी अतिशय प्रेरणादायी : आमदार ऋतुराज पाटील

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे

ज्येष्ठ विचारवंत भारत पाटणकर  यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी खासदार शरदचंद्रजी पवार साहेब,खासदार शाहू छत्रपती महाराज, खासदार विशालजी पाटील यांच्या समवेत उपस्थित राहिलो .दिग्गजांसोबत व्यासपीठ शेअर करताना वेगळीच ऊर्जा मिळाली.

 

 

पाटणकर सरांनी समाजातील वंचित, दलित, उपेक्षित,आदिवासी अशा सर्व घटकांच्या हक्कासाठी आयुष्यभर रस्त्यावरची आणि विचारांची लढाई केली. त्यांचा हा जीवन प्रवास माझ्यासारख्या तरुणांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे.

यावेळी आदरणीय सरोज पाटील (माई), लोकमतचे संपादक वसंत भोसले , कृष्णा पाटील, व्ही.बी. पाटील( काका), डॉ. गोपाळ गुरूजी,मनिषा गुप्ते ,के.जे. जॉयजी ,प्रमोद मुजुमदार, सुहास फडतरे, आनंदराव पाटील, प्रा. टी.एस. पाटील, सतीश लोंढे, मोहनराव यादव ,कॉ.संपत देसाईजी यांच्यासह श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 8080365706